होम | श्रीपाद सेवा मंडळ | प्रकल्प | श्रीवामनराज प्रकाशन | परंपरा | उत्सव | फोटो गँलरी | संपर्क | डाऊनलोड Change Language

'श्रीपाद सेवा मंडळा'चे मुखपत्र
।। श्रीवामनराज ।।
त्रैमासिक

शक्‍तिपातयोग-साधनेविषयी सर्वांगीण चिंतन मांडणारे, प्रत्येक साधकाच्या घरी असलेच पाहिजे असे; सुबोध, संग्राह्य, अपूर्व आणि एकमेव मराठी त्रैमासिक.
अधिक माहिती ...
परंपरा
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज

भगवत्पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांनंतर, आसेतुहिमाचल परिभ्रमण करून, संन्यासाश्रमाच्या मानदंडांचे परिपालन अत्यंत काटेकोरपणाने करून, शास्त्रमर्यादांचे किंचितही उल्लंघन न करता अत्यंत मोठी, अद्भुत वाङ्मयनिर्मिती करणारे असे केवळ श्रीस्वामी महाराजच म्हणावे लागतील. आदर्शांच्या वस्तुपाठांनीही त्यांच्या श्रीचरणी बसून शास्त्रांची मूळाक्षरे गिरवावी; अशी श्रीस्वामी महाराजांची विलक्षण शास्त्रपूत जीवनशैली होती.

प.प. श्रीस्वामी महाराजांची सारी ग्रंथ रचना ही अतिशय विस्मित करणारी आहे. प.प. श्रीस्वामी महाराजांची ग्रंथ रचना पुढीलप्रमाणे:

अ) संस्कृत:
१)श्रीगुरुसंहिता २)श्रीदत्तपुराणम् ३)श्रीगुरुचरितम् ४)दत्तचम्पू: ५)त्रिशति-गुरुचरित्रम् ६)कुमारशिक्षा ७)युवाशिक्षा ८)वृद्धशिक्षा ९)पंचपाक्षिकम् १०)योगरस्य ११)बोधरहस्य (यातील काही ग्रंथ सटीक आहेत)

ब) मराठी:
१)श्रीदत्तमहात्म्य २)श्रीदत्तलीलामृताब्धिसार ३)श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार ४)माघमहात्म्य ५)प्राकृत मनन ६)स्त्रीशिक्षा ७)आत्मचिंतन ८)पत्रसंग्रह ९)संस्कृत-मराठी ४०० हून अधिक स्तोत्रे, पदे.

श्रीदत्तभक्ती, मंत्रगर्भता, भावमयता, परब्रह्म स्वरूपता, प्रापंचिक दु:खनिवारणक्षमता, वेदशास्त्रपुराणोक्तता याशिवाय अत्यंत आशयगर्भ रचना, अर्थ-सौंदर्य, रचना-सौष्ठव रसात्मकता, व्याकरण शुद्धता अशा अनेक अभिजात गुणवैशिष्ठ्यांनी समृद्ध अशी श्रीस्वामीमहाराजांची दिव्य साहित्य संपदा आहे.

श्रीपाद सेवा मंडळाच्या श्रीवामनराज प्रकशनाद्वारे 'अक्षय वाङ्मयमाला' योजनेअंतर्गत ही सर्व ग्रंथसंपदा प.प.श्री स्वामी महाराजांच्या कृपा-आशीर्वादाने पुन:प्रकाशित होत आहे.