'श्रीपाद सेवा मंडळा'चे मुखपत्र
।। श्रीवामनराज ।।
त्रैमासिक
शक्तिपातयोग-साधनेविषयी सर्वांगीण चिंतन मांडणारे, प्रत्येक साधकाच्या घरी असलेच पाहिजे असे; सुबोध, संग्राह्य, अपूर्व आणि एकमेव मराठी त्रैमासिक.
अधिक माहिती ...
परंपरा
प.पू. सद्गुरु मातोश्री पार्वतीदेवी देशपांडे
प.पू. सद्गुरु श्री मामांच्या मातोश्री या खरोखरीच एका अलौकिक व्यक्तिमत्वाच्या धनी होत्या. राजाधिराज सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांनी ज्यांना ‘आमची पोर’ म्हणून संबोधिले, त्यांच्या आध्यात्मिक आणि ऐहिक योग्यतेची, ऐश्वर्याची केवळ कल्पनाच केलेली बरी!
लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण न घेतलेल्या मातोश्रींना ज्योतिषविद्या व वैद्यकीचे विस्मयकारी ज्ञान होते. त्यांचे श्रीज्ञानेश्वरीचे चिंतन-मननही अपूर्व असे होते. अत्यंत सोप्या भाषेत, रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन; त्या रामेश्वराच्या मंदिरात जमणाय्रा गावातल्या बायकांना श्रीज्ञानेश्वरीचा अर्थ समजवून सांगत असत.
प.पू. श्री मामांना ज्यांनी अक्षरक्ष: घडवले, त्या परमसद्गुरु मातोश्रींचे तपस्यातेज-सामर्थ्य अत्यंत अद्भुत होते.
अलिप्तपणे प्रपंचात राहणाय्रा, अष्टावधानी, परमार्थप्रवण आचरण असलेल्या पार्वतीदेवी अतिशय निर्धारी, धैर्यवान, योगैश्वर्यसंपन्न, परमभगवद्भक्त आणि अत्यंत प्रेमळ होत्या.
आपणां सर्वांना उत्तुंग आदर्शवत् वाटावे असे त्यांच्यासारखे सर्वांगपरिपूर्ण असे दुसरे व्यक्तिमत्व मिळणे कठीण!