'श्रीपाद सेवा मंडळा'चे मुखपत्र
।। श्रीवामनराज ।।
त्रैमासिक
शक्तिपातयोग-साधनेविषयी सर्वांगीण चिंतन मांडणारे, प्रत्येक साधकाच्या घरी असलेच पाहिजे असे; सुबोध, संग्राह्य, अपूर्व आणि एकमेव मराठी त्रैमासिक.
अधिक माहिती ...
परंपरा
प.पू.सद्गुरु योगिराज श्री.श्री.द.(मामा) देशपांडे महाराज
प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांच्या कृपाप्रसादाने, सत्वशील, सद्भक्त अशा श्री. दत्तोपंत व पार्वतीदेवी या माता-पितरांच्या पोटी ‘श्रीपाद’ हे अन्वर्थक नामाभिधान धारण करणाय्रा, विसाव्या शतकातील शक्तिपातयोगविद्येचे अध्वर्यू असलेल्या या अलौकिक विभूतिमत्वाचा जन्म झाला. तपोनिधी सद्गुरु मातोश्रींकडून शक्तिपात अनुग्रह लाभल्यावर, प.पू.श्री मामांनी नामस्मरण, जपजाप्य, ध्यानधारणा , साधना श्रीज्ञानदेवीचिंतनाचे व्रत अखंड आचरले.
परंपरेच्या आदेशानुसार, प.पू. श्री सद्गुरु योगीराज श्री गुळवणी महाराजांकडून आणि संप्रदायकार्य पुढे चालविण्याचे अधिकार प्राप्त झाल्यावर सामान्य जनांच्या उद्धाराचे कार्य तळमळीने अंगीकारून, प.पू.श्री मामांनी भक्तिप्रेमामृतसारचे निरंतर दान केले.
श्रीदत्तसंप्रदाय, श्रीभागवतसंप्रदाय व श्रीनाथसंप्रदाय यांचा अद्भुत मनोहर असा विलक्षण त्रिवेणीसंगम प.पू.श्री मामांच्या ठायी झालेला होता. स्वतः प्रत्यक्ष श्रीदत्तावतार असूनही, सर्वसिद्धी पायी लोटांगण घालीत असूनही, आपले पारमार्थिक वैभव प्रकट न करता, लौकिकात जनसामान्यांप्रमाणे आचरून, प.पू.श्री मामांनी अक्षरक्षः हजारो लोकांना कृ्पा करून त्यांचा उद्धार केला. दीक्षा, प्रवचन-कीर्तने, लेखन, अनुष्ठाने, भक्तियात्रा, शिबिरे, शंकासमाधान अशा असंख्य प्रकारे श्रीज्ञानेश्वरीच्या प्रचार-प्रसारचे ध्येय समोर ठेवून प.पू.श्री मामांनी अनेकांना साधनेची व ज्ञानेश्वरीची गोडी लावली. त्यांचा योग आणि बोधही पक्का केला.
प.पू.श्री मामा सद्गुणांची मूर्ती होते. दया-क्षमा-शांतीचे माहेर होते. प्रसिद्धीपराङ्मुख राहून, प.पू.श्री मामा लोककल्याणासाठी अविरत, अविश्रांत झटले. लोकसेवेचे व्रत त्यांनी अखंड अंगीकारले.
प.पू. सद्गुरु श्री मामांनी संकल्पिलेले आणि अंगीकारलेले अनेक प्रकल्प व उपक्रम, त्यांचेच संप्रदायोक्त कार्य पुढे चालविणाय्रा प.पू.सौ. शकाताई व प.पू.श्री शिरीषदादांच्या अमूल्य मार्गदर्शन-प्रेरणेने, अथक परिश्रम-प्रयत्नांनी कार्यान्वित झालेले आहेत. पूर्णस्वरूपात साकारत आहेत. आपल्या समाजहितैषी कार्याने, देशात व परदेशांतही आपला फार मोठा ठसा उमटवलेले प्रकल्प पुढील प्रमाणेः
- श्रीपाद सेवा मंडळ सामाजिक व आध्यात्मिक न्यास
- श्रीवामनराज प्रकाशन
- श्रीक्षेत्र दत्तधाम प्रकल्प, हेळवाक
- श्रीक्षेत्र माणगांव तपोवन
- श्रीक्षेत्र जळगांव-जामोद श्रीदत्तमंदिर प्रकल्प
- श्रीक्षेत्र आळंदी ज्ञानदेव सिद्धबेट तपोवन व श्रीसंत मुक्ताई विद्यापीठ प्रकल्प
- श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय, आळंदी
- प.पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय, पुणे