होम | श्रीपाद सेवा मंडळ | प्रकल्प | श्रीवामनराज प्रकाशन | परंपरा | उत्सव | फोटो गँलरी | संपर्क | डाऊनलोड Change Language

'श्रीपाद सेवा मंडळा'चे मुखपत्र
।। श्रीवामनराज ।।
त्रैमासिक

शक्‍तिपातयोग-साधनेविषयी सर्वांगीण चिंतन मांडणारे, प्रत्येक साधकाच्या घरी असलेच पाहिजे असे; सुबोध, संग्राह्य, अपूर्व आणि एकमेव मराठी त्रैमासिक.
अधिक माहिती ...
परंपरा
भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगिराज प.पू.श्री वा.द. गुळवणी महाराज

प.पू. सद्गुरु योगिराज श्री गुळवणी महाराज यांचा जन्म श्री दत्तभट व सौ. उमाबाई या वैराग्यसंपन्न व सत्शील दांपत्याच्यापोटी, श्रीक्षेत्र नृसिंहवाडीचे प.प.श्री नारायणस्वामी महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने झाला.

श्रीमहाराज हे परंपरेतील महान अधिकारी व साक्षात् श्रीदत्तावतार भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती महाराज यांचेच अवतार होते.

प्रथम प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांकडून श्रीमहाराजांना मंत्रोपदेश व दत्तोपासनेची प्राप्ती झाली.

श्रीस्वामी महाराजांनी त्यांना गीता-उपनिषदे-ब्रह्मसूत्रे यांचे स्वमुखाने पाठ दिले. श्रीदत्तमालामंत्रासारख्या दुर्मिळ मंत्रची साधना दिली. योगासने व हठयोगाचेही मार्गदर्शन केले.

अत्यंत तळमळीने, प्रेमाने श्रीमहाराजांनी शास्त्रपूत आचरणासहित आपली साधना अखंड चालू ठेवली. पुढे हुशंगाबाद येथे प.प.श्री लोकनाथतीर्थ स्वामीमहाराजांशी श्रीमहाराजांची भेट झाली. ईश्वरानुभूतीसाठी आवश्यक असणाय्रा कुंडलिनी जागृतीसाठी होणारी शक्तिपातयोगविद्येची दीक्षा व संप्रदायाच्या प्रचारासाठीचे दीक्षाधिकारही प.प.श्री स्वामीमहाराजांकडून प्राप्त झाले.

श्रीमहाराज चित्रकला व छायाचित्रण कलेत अत्यंत निपुण होते. लौकिकार्थाने व्यवहारात त्यांनी काही काळ चित्रकला शिक्षक म्हणून नोकरीही केली. पुढे सद्गुरुआज्ञेने, साधकांना मार्गदर्शन व दीक्षानुग्रहाचे कार्य श्रीमहाराजांनी अखंड अंगीकारले.

श्रीदत्तसंप्रदायाच्या दीक्षानुग्रह कार्याची धुरा, श्रीसद्गुरु परंपरेच्या आज्ञेने, प.प. श्री गुळवणीमहाराजांचे एकमेव अधिकारी शिष्योत्तम प.पू. सद्गुरु श्री मामा यांच्याकडे प्रसारार्थ आलेली आहे. आजही प.पू. सद्गुरु योगिराज श्री मामांच्या परंपरेत या शक्तिपात योगविद्येचा अत्यंत शुद्ध स्वरूपात, शास्त्रोचित, यथार्थ निर्वाह होत आहे.