होम | श्रीपाद सेवा मंडळ | प्रकल्प | श्रीवामनराज प्रकाशन | परंपरा | उत्सव | फोटो गँलरी | संपर्क | डाऊनलोड Change Language

'श्रीपाद सेवा मंडळा'चे मुखपत्र
।। श्रीवामनराज ।।
त्रैमासिक

शक्‍तिपातयोग-साधनेविषयी सर्वांगीण चिंतन मांडणारे, प्रत्येक साधकाच्या घरी असलेच पाहिजे असे; सुबोध, संग्राह्य, अपूर्व आणि एकमेव मराठी त्रैमासिक.
अधिक माहिती ...
प.पू.सद्‌गुरू श्री. मामासाहेब देशपांडे ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय

आनंदनगरातील ग्रंथपुण्यसंपत्ती

११ मार्च १९९१ रोजी, फाल्गुन वद्य नवमी, ’श्रीपादनवमी’ या शुभदिनी ’श्रीपाद सेवा मंडळ संचालित’ ’प.पू.सद्‌गुरू श्री. मामासाहेब देशपांडे ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालया’ची स्थापना झाली. प.पू. श्री.मामांप्रमाणेच ग्रंथावर अतीव प्रेम असण्याऱ्या प.पू.श्री.शिरीषदादांनी स्वत:जवळील अमूल्य, जिवापाड जपलेले फार मोठे ग्रंथभांडार ग्रंथालयास दिले; आणि त्यामुळेच त्यांच्या दुर्मिळ, अनमोल ग्रंथांचा लाभ आज सर्वाना घेता येत आहे. वाचनासाठी, अभ्यासासाठी श्रीसद्‌गुरूंचे आणि परमगुरूंचेही वैयक्तिक ग्रंथ उपलब्ध व्हावेत ही केवळ आपणां सर्वावरील त्यांची अपार कॄपाछाया आणि निष्काम प्रेमाची अमूल्य अशी भेटच आहे. १ एप्रिल २००० साली, वर्षभरातच ग्रंथालयाला महाराष्ट्र शासनाची ’ब’ वर्गाची मान्यताही मिळाली.

तयाचा वेलू गेला:

पंचवीस सभासदांवरून आज पाचशे सोळा एवढी वाचक सभासदांची संख्या झाली असून, असंख्य वाचक मोफत वृत्तपत्रवाचनाचा लाभ घेतात. सात वर्षात ग्रंथनोंदणीत सतत भर पडत असून, सध्या वीसहजार नोंदणीकृत ग्रंथ वाचकांना उपलब्ध आहेत. बावत्र मासिके, साप्ताहिके, पाक्षिके, त्रैमासिके इत्यादींबरोबर, सोळा वृत्तपत्रे वाचकांना वाचनासाठी उपलब्ध आहेत. दोन वर्षांपूर्वी, ग्रंथालयाची स्वतंत्र देखणी इमारत झाली असून, संगणकीय सुविधाही ग्रंथालयात आहे. ग्रंथालयाला लवकरच महाराष्ट्र शासनाकडून ’अ’ वर्ग मिळेल असा आमचा प्रयत्न आहे.

ग्रंथालयाच्या या विस्तारासाठी ’श्रीपाद सेवा मंडळ’ अथक परिश्रम करीत आहे. तसेच अमूल्य संतवाड्‌:मय, वर्ल्डबुक्स, अनेक दुर्मिळ ग्रंथ प.पू. श्री. शिरीषदादांनी ग्रंथालयास वैयक्तिक ग्रंथसंग्रहातून दिलेले आहेत.

मान्यवर अभ्यासक डाँ. वि. मा. बाचल, डाँ. प्र. वि. कुलकर्णी, श्री. जयंत वष्ट, डाँ. व. दि. कुलकर्णी स्मृती समिती, विश्वभारत सांस्कृतिक केंद्र इत्यादींनी, तसेच अनेक ग्रंथप्रेमी बंधुभगिनींनी अमूल्य अशा ग्रंथांची स्नेहभेट देऊन, ग्रंथालय समृध्द बनवण्यास मोठा हातभार लावलेला आहे.

अनेक नवनवीन साहित्यकृतींची ग्रंथालयातर्फे वेळोवेळी खरेदी होत असते. गीता प्रेस-गोरखपूरचे समग्र वाड्‌;मय, रामकृष्ण मठ प्रकाशित वाड्‌मय, कल्पतरू रिसर्च अँकँडमीचे वाड्‍:मय, श्रीवामनराज प्रकाशनाचे सर्व ग्रंथ, श्रीपंत महाराज (बाळेकुंद्री), श्रीरमणमहर्षी, श्रीगुरूदेव रानडे, श्रीसंत गुलाबराव महाराज, योगी अरविंद इत्यादींच्या वाड्‌:मयाबरोबरच, निवडक कथा-कादंबऱ्या, विविध भाषांतील वाड्‌मयही चोखंदळपणे खरेदी करण्यासाठी ग्रंथालय नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. त्यामुळेच शेकडो विषयांवरील हजारो पुस्तके ग्रंथालयात आहेत.

ग्रंथालयाची स्वत:ची अशी काही खास वैशिष्ट्ये

(१) मध्यवर्ती ठिकाणी असूनही शांत व स्वच्छ परिसर आहे. ग्रंथालयात प्रवेशतानाच प्रसन्नतेचा, ताजेपणाचा आणि आनंदाचा शिडकावा होतो.

(२) ग्रंथालय स्वतंत्र असून वृत्तपत्रवाचनासाठी येणाऱ्यांना स्वतंत्र वाचनकक्ष व बैठकव्यवस्था आहे. मोफत वृत्तपत्रे वाचनास सर्वांना उपलब्ध आहेत.

(३) स्वतंत्र महिला विभाग : खास महिलांच्या आवडीचे, गरजेचे विषय ओळखून, त्यावरील निवडक पुस्तके या स्वतंत्र विभागात ठेवलेली आहेत. बाल-संगोपन, बालमानसशास्त्र, विणकाम, भरतकाम, पाकशास्त्र, घरगुती औषधे, तसेच मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी उपयुक्त अशी विविध भाषांतील पुस्तके येथे आहेत. संतचरित्रे व पौराणिक कथा, कादंबऱ्या, काव्य इत्यादी ग्रंथ देखील आहेत.

(४) बाल वाचक विभाग : बालांसाठी संतचरित्रमाला, पंचतत्र, इसापनीती, रामायण महाभारत इत्यादी पुस्तकांबरोबरच रामकॄष्ण मठ प्रकाशित, गीताप्रेस प्रकाशित, पू. कलावतीदेवी इत्यादींची संस्कारक्षम पुस्तकेही आहेत. भारत-भारती प्रकाशनाचीही पुस्तके आहेत. टारझन, हँरी पाँटर, अरेबियन नाइट्‍स यांसह बोक्या सातबंडे, फास्टर फेणे अशी मुलांची पुस्तकेही आहेत. त्यांना विशेष अभ्यासासाठी एन्‌सायक्लोपीडिया (ब्रिटानिका), विश्वकोश, शब्द-कोशही उपलब्ध आहे. नीतीकथा-बोधकथा, जादू विनोदी कथा असे विविध भाषांतील विपूल वाड्‌:मय ग्रंथालयाच्या बालविभागात आहे.

(५) युवक-युवतिंसाठी कथा-कादंबऱ्या, गूढ कथा इत्यादींबरोबर संगणक व अभियांत्रिकीच्या अनेक शाखा यांची अनेक दुर्मिळ पुस्तके आहेत; त्यांचा अनेक तरुण वाचक लाभ घेत आहेत.

(६) प्रौढ वाचक वर्गासाठी सर्व प्रकारच्या ललित साहित्याबरोबरच संपूर्ण चातुर्मास, व्रतवैकल्पे, तिर्थयात्रा, क्षेत्रमाहात्म्य, पुराणे, संतवाड्‌:मय असे धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथही उपलब्ध आहेत.

(७) सभासदांना एका पुस्तकाबरोबर एक नियतकालिकही घरी नेता येते.

(८) दूरध्वनीव्दारे सुध्दा पुस्तक परतीची मुदत वाढविता येते. दूरवर, परगावी राहणाऱ्या वाचकांच्या सोईसाठी आवर्जून ही सवलत दिलेली आहे.
सर्व प्रकारचे वाड्‌:मय उपलब्ध असूनही, मन:शांती मिळवून देणारे असे केवळ संतवाड्‌:मय, सतंसाहित्यच आहे. हे हळूहळू पटून, वाचक अखेर पारमार्थिक वाड्‍:मयाकडे वळू लागतात.

(९) समृध्द संदर्भ विभागातील ग्रंथांचा, संस्कृत, मराठी, हिंदी वाड्‌:मयाचा अभ्यासक, वाचक नियमित लाभ घेत असतात. अभ्यासकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था संदर्भ विभागातच असल्यामुळे त्यांची फार मोठी सोय झालेली आहे.

(१०) शासकीय ग्रंथालयातून दरमहा पन्नास पुस्तके वाचकांच्या मागणीनुसार आणली जातात. वाचकांच्या आवडीप्रमाणे अनेक नवीन ग्रंथांचा, त्यांना लाभ करून दिला जातो.

११) सर्वात महत्त्वाचे म्हणजे संतसाहित्यविषयक व श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, श्रीसंत नामदेव, श्रीसंत तुकाराम, श्रीसंत एकनाथ महाराज, या संतांचे तसेच रमणमहर्षि, जे. कृष्णमूर्ति, प्रज्ञाचक्षू श्रीगुलाबराव महाराज, श्रीगोंदवलेकर महाराज, योगी असविंद, ओशो रजनीश, श्रीगुरूदेव रानडे, श्रीपंत महाराज (बाळेकुंद्री) इत्यादी विविध संतांचे सर्व वाड्‌:मय उपासकांना, वाचकांना अभ्यासासाठी ग्रंथालयात उपलब्ध आहे. गुरूनानकांचेही वाड्‌:मय ग्रंथालयात आहे.