होम | श्रीपाद सेवा मंडळ | प्रकल्प | श्रीवामनराज प्रकाशन | परंपरा | उत्सव | फोटो गँलरी | संपर्क | डाऊनलोड Change Language

'श्रीपाद सेवा मंडळा'चे मुखपत्र
।। श्रीवामनराज ।।
त्रैमासिक

शक्‍तिपातयोग-साधनेविषयी सर्वांगीण चिंतन मांडणारे, प्रत्येक साधकाच्या घरी असलेच पाहिजे असे; सुबोध, संग्राह्य, अपूर्व आणि एकमेव मराठी त्रैमासिक.
अधिक माहिती ...
परंपरा
भगवान श्रीदत्तात्रेय प्रभू

परमानंदस्वरूप श्रीभगवंतांनी विश्वाच्या उद्धारासाठी धारण केलेले ‘श्रीगुरुरूप’ म्हणजे भगवान श्रीदत्तात्रेय प्रभू होत! उत्पत्ती, स्थिती, लय, अनुग्रह आणि निग्रह अशी पाचही कृत्ये लीलया करणारे, ज्ञानस्वरूप, आनंदकंद असे श्रीगुरूतत्व म्हणजेच श्रीदत्तात्रेय प्रभू!

ब्रम्हदेवांचे पुत्र असणाऱ्या ब्रम्हर्षी अत्रीमुनी आणि महासती अनसूया यांच्या पोटी भगवान ब्रम्हदेव, भगवान शिव आणि भगवान विष्णू, अनुक्रमे चंद्र, दुर्वास आणि श्रीदत्त अशा तीन रूपांनी अवतरले. त्यांतील त्रिमूर्तीरूप श्रीदत्त हे अखिल विश्वाचे श्रीगुरु आहेत. भगवान श्रीदत्तप्रभूंचे सारे चरित्र आणि लीला मोठ्या विलक्षण आणि अद्भुत आहेत. ते परमसामर्थ्यवान, भक्तप्रतिपालक, शरणागतवत्सल आणि सर्वश्रेष्ठ आहेत.

श्रीमद् भागवत महापुराणात श्रीदत्तप्रभूंना श्रीविष्णूंचे अवतार म्हटले आहे. तसेच त्यांचा उपदेश ‘अवधूतगीता’ या नावाने संकलित केलेला आहे. श्रीदत्तप्रभू हे सर्व परंपरांचे, चराचराचे आद्यगुरु आहेत.

श्रीगुरुचरित्र, श्रीदत्तपुराण, श्रीदत्तमहात्म्य इत्यादी ग्रंथांमधून श्रीदत्तप्रभूंच्या साऱ्या लीलाचरित्राचे संकलन केलेले आढळते.