'श्रीपाद सेवा मंडळा'चे मुखपत्र
।। श्रीवामनराज ।। त्रैमासिक
शक्तिपातयोग-साधनेविषयी सर्वांगीण चिंतन मांडणारे, प्रत्येक साधकाच्या घरी असलेच पाहिजे असे; सुबोध, संग्राह्य, अपूर्व आणि एकमेव मराठी त्रैमासिक.
अधिक माहिती ...
बापरखुमादेविवरु
।। बापरखुमादेविवरु ।। श्री ज्ञानदेव सिद्धबेट तपोवन,
ज्ञान-योग-अध्यात्म विद्यापीठ प्रतिष्ठानचा एक उपक्रम.
'श्रीसंत मुक्ताई विद्यापीठा'चे मुखपत्र.
सद्गुरु श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वज्ञान आणि साहित्य परंपरेच्या सर्वांगीण अभ्यासाला वाहिलेले एकमेव मराठी मासिक.
टीप:- आपल्याला बापरखुमादेविवरुचा या व्यतिरिक्त कुठलाही अंक हवा असल्यास कृपया ssmandal@vsnl.com या ई-मेल वर संपर्क साधावा.
प्रेरक आणि संस्थापक
वै. श्रीसंत प.पू.श्री.श्री.द. (मामा) देशपांडे
संपादक
श्री. शिरीष शांताराम कवडे
सहसंपादक
सौ. शकुंतला जयंत आगटे
प्रत्येक विजयादशमीला नवीन वर्षाचा शुभारंभ. मराठी महिन्यांप्रमाणे, बारा महिन्यांचे बारा; दर्जेदार, संग्राह्य व संदर्भमूल्ये असलेले अंक.
अंकात कोठल्याही जाहिराती नसतात.
अभ्यासक, चिकित्सक, भाविक आणि तत्वनिष्ठ; तसेच साधक आणि सिद्धांचेही; परस्पर संवादाचे एकमेव लडिवाळ व्यासपीठ.
संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून विख्यात असलेल्या, अनेक नामवंतांचे दर्जेदार, अविस्मरणीय, बहुमूल्य लिखाण.
साहित्य, संस्कृती, सौंदर्य, तत्वज्ञान, अंतरानुभूती आदी विविध अंगांनी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्मयाचा, संतवाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास.
सातव्या वर्षात यशस्वी पदार्पण. अभ्यासक, रसिक जाणकारांनी प्रशंसिलेले, वाचकप्रिय असे श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन श्रीचरणी वाहिलेले एकमेव सेवाभावी मासिक.