'श्रीपाद सेवा मंडळा'चे मुखपत्र
।। श्रीवामनराज ।।
त्रैमासिक
शक्तिपातयोग-साधनेविषयी सर्वांगीण चिंतन मांडणारे, प्रत्येक साधकाच्या घरी असलेच पाहिजे असे; सुबोध, संग्राह्य, अपूर्व आणि एकमेव मराठी त्रैमासिक.
अधिक माहिती ...
’श्रीपाद सेवा मंडळा’ बद्दल
प.पू.सदगुरू श्री.श्री.द.(मामा) देशपांडे हे श्रीदत्त संप्रदाय,नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू असून, शक्तिपातयोग संप्रदायाचे आचार्य होते. इ.स.१९९० साली, प.पू.श्री.मामांनी स्वेच्छेने देह ठेवला. इ.स.१९९१ साली, त्यांनी दिलेले कार्य पुढे चालविण्यासाठी, हे कार्य म्हणजे श्रीसद्गुरूसेवाव्रत आहे या दृढविश्वासाने, भावनेने प.पू.श्री. मामांच्या नावाने ’श्रीपाद सेवा मडंळ’ ही संस्था स्थापन करण्यात आली.
’श्रीपाद सेवा मंडळा’ चे, प्राथमिक शाळा, मोफत दवाखाने, आरोग्यशिबिरे, वैदिक कृषिविद्या, गोपालन व गवायुर्वेद, आयुर्वेद संशोधन केंद्र इत्यादी अनेक प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांना उपयुक्त ठरणारा, सांधणारा असा ’ग्रंथालय’ हा विभाग आहे.
श्रीपाद सेवा मंडळ (पब्लिक ट्रस्ट पं. क्र. ए-१९९३ पुणे / २५-०१-१९९१) ही जनसेवेसाठी वाहिलेली ना-नफा तत्वावर आधारलेली अन्तर्राष्ट्रीय संस्था आहे.
श्रीदत्तसंप्रदाय, श्रीनाथसंप्रदाय आणि श्रीभागवतसंप्रदायाच्या तत्वज्ञानचा साऱ्या विश्वामध्ये प्रचार-प्रसार करण्यासाठी 'श्रीपाद सेवा मंडळ' ही संस्था कटिबद्ध आहे.